‘ स्त्री ’ आणि स्त्री ची अस्मि ता दोन दगडाच्या जात्याच्या पाळूमध्ये कडधान्य टाकत त्यावर वेदने च्या अन् दुःखा च्या ओव्या गात , आयुष्यभर संसाराचं जातं फिरवते ती असते एक स्त्री ... कधी ती इतिहासाच्या पानावरती जिजामाता - सावित्रीबाई - अहिल्यादेवी - रमाबाई म्हणून पहावयास मिळाली तर कधी कोणाची आई , बहीण , मावशी , आजी , पत्नी , सून म्हणून पाहायला मिळाली . ही स्त्री कधी पाणपोया , घाट , कुंड उभारून जनसेवेचे व्रत घेणारी आदर्श लोकसेवकअहिल्यादेवी होळकर म्हणून पाहायला मिळाली . कधी ती असमानतेच्या विरोधात समतेचा असूड घेऊन शिक्षणाची मशाल पेटवणारी , मनुवादी व्यवस्थेच्या छताडावरती बसून क्रांती करणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून पाहायला मिळाली . तर कधी आजच्या काळातील डॉक्टर , वकील , इंजिनियर म्हणून पाहायला मिळाली . राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या रूपाने समाज व्यवस्थेत खालच्या स्तरात गणल्या...