पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माळी समाजातील तरूणांची दशा व दिशा

इमेज
 माळी समाजातील तरूणांची दशा व दिशा ॲड. बिभीषण गदादे पाठीमागच्या पिढीच्या खांद्यावर उभी राहून पुढची पीढी जन्म घेत असते. गेल्या पीढीतील माळी समाजाच्या अर्थिक सामाजिक राजकिय उंचीवर आताच्या फळीतील व पिढीतील माळी तरूणांची उंची लक्षात येईल. त्या अर्थाने या पिढीवर पाठीमागच्या पिढीचा मोठा प्रभाव आहे हे नाकारून चालणार नाही. रोटी ,कपडा, मकान या संघर्षातच आमची अगोदरची पिढी खर्च झाली हे वास्तव आहे. आता त्या अर्थाने  सद्यस्थितीतील धडपड्या तरूणांना चांगले दिवस आहेत. रोटी, कपडा, मकान च्या पलिकडे व्यावसायिक व शैक्षणिक उंचीवर जाण्याचा मानस आताच्या तरूणांकडे दिसतो. कारण रोटी कपडा पुरता संघर्ष राहिला नाही.व्यवसाय व शिक्षणातही अग्रेसर राहिलेला तरूण आज पहायला मिळतो. पाठीमागच्या पिढीचे हेच उपकार आहेत. आता ज्यांच्या पाठीमागच्या पिढीने  हातपाय हलवले नाहीत त्यांना अर्ध आयुष्य तरी प्राथमिक गरजांच्या साठी खर्च करावं लागत आहे हे वास्तव. शिक्षण, मती, निती या पायर्या चढलेला तरूण या प्रचंड चढाओढीच्या युगात उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरिही वित्त, व सत्ता याबाबतीत या पिढीला मोठा संघर्ष करावा लागणार...

राजकारण...आणि आम्ही.

इमेज
   राजकारण...आणि आम्ही.                          _ॲड. बिभीषण गदादे        राजकारण..आम्हाला काय इंटरेस्ट नाही. असं म्हणलं म्हणजे आपण फार काही शहाणं झालो असं समजायचं मुळीच कारण नाही. माणुस हा समुहाने राहणारा प्राणी आहे. समुह म्हणलं की समुहाच्या अस्तित्वासाठी नियम आले. नियम मग ते बनवणारी शाखा अाली, ती राबवणारी यंत्रणा आली , यंत्रणेसाठी खर्च आला..अर्थकारण आलं आणि मग पुन्हा त्याचेही नियम आले. या नियमाला बनवणारी सरकार नावाची यंत्रणा आली. जी जन्म घेते राजकारणातून.. म्हणुन कितीही शहाणपण वापरून राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तरी तोटा जनतेचाच होणार आहे. हे समजून घ्यायला हवं.    पटो किंवा न पटो समाजात अस्तित्वासाठी प्रत्येकाचा अंतर्गत लढा चालू असतो. तसाच भारतीय समुहातही हा लढा हजारो वर्षापासून लढला जातोय. या लढ्याला वेगवेगळ्या पातळीवर लढता येतं. जसं, घरातले नियम आणि अंमलबजावणी साठी घरात कोण राजा असावा यासाठी मातृसत्ताक व पितृसत्ताक व्यवस्थांमध्ये राजकारण आहे. गावचा कारभार कोणी पहायचा यावरून सरपंच पद...

शुभमंगलं... विश्राम..!!!

इमेज
    शुभमंगलं.. विश्राम!!    -------अॅड बिभीषण गदादे खरं तर हल्ली मुलींच्या पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. सगळ्याच अपेक्षांची पुर्तता करणारं मशिनसुद्धा बाजारात अजून उपलब्ध नाही तिथे मुलांची काय कथा? नोकरी हवी.. ती सरकारी हवी.. त्यात चांगली पोस्ट हवी.. त्यात चांगला पगार हवा.. त्यात बॅंक बॅलन्स हवा.. त्यात गाडी हवी.. त्यात घर हवं.. तेही पुण्या मुंबईत हवं.. त्या घरात फक्त आपणच रहायचे... सासू सासरे नंनंद वैगेर आपल्याजवळ नको..जमिन हवी.. त्यात पाणी हवं.. बागायती हवी.. पन मुलगी शेतात काम करणार नाही..मग शेती कसायची नाही तर शेती हवी कशाला? मुलगा सुंदर हवा..शिकलेला हवा.. निर्व्यसनी हवा..वय जास्त नको..विचार चांगले हवे..मुलीच्या आई वडिलांचा आदर करणारा हवा.. किती ह्या अपेक्षा?? या येवढ्या अपेक्षांचे जुलाब होत नाहीत का यांना? तुमच्या पिढ्यांना ही येवढं सगळं करता आलं नाही तर नुकत्याच नोकरी वा व्यवसायात गुंतलेल्या मुलांकडून अशा अपेक्षा कशा करू शकता ??   काळ बदलला हे खरच आहे. जगण्याच्या संघर्षात अपेक्षांची दिवसेंदिवस भर पडत आहे . शिक्षणाच्या अग्निपरिक्षेतून पास तर झालो. ...

सावधान..!! रात्र अन दिवसही वै-याचा आहे.. -एडवोकेट बिभीषण गदादे

इमेज
             सावधान..रात्र अन दिवसही वै-याचा आहे   आपल्याकडे एक म्हण आहे 'झालं-गेलं-गंगेला मिळालं' दारुडा जरी मेला तरी मेल्यावर 'कसा का होईना बरा होता बिचारा..' म्हणायचा रिवाज आहे. माणसाच्या मृत्युनंतर त्याच्याशी असणारं वैर संपायला हवं. काल परवा औरंगाबाद ला एक सभा झाली. सभेच्या वक्त्याने अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाचं डफड वाजवायला सुरू केलं. खिलजी हा मुसलमान होता की हिंदू होता माहीत नाही पन द्वेशाचं सरण मात्र आज ही धार्मिक राज'कारणाच्या मनात धुसमसत आहे हे स्पष्ट झालं. आणि मग हिंदू मिर्झाराजे जयसिंगाच्या आक्रमणावर कोणी का बोलू नये? हा प्रश्न वेगळा.      शरद पवारांनी जातीच्या आधारे द्वेश पसरवल्याचा आरोपही या सभेत झाला. जाती वरून द्वेश करणं चुकीचं असल्याचं ज्ञान वक्त्याने पाजळलं. बरोबर आहे 'जातीच्या आधारे द्वेश करणं चुकीचं आहेच.. माणसा-माणसात कशाला भेद करायचे, नाही का? ' पन माननिय वक्त्याने धर्म धर्मात भेद करण्यावर ब्र सुद्धा काढला नाही? नाही म्हणजे जातीच्या आधारे मतं मागणारे ,राजकारण करणारे शरद पवार दोषी तर मग धर्माच्या आधारे राजकारण...