शुभमंगलं... विश्राम..!!!

    शुभमंगलं.. विश्राम!!   

-------अॅड बिभीषण गदादे

खरं तर हल्ली मुलींच्या पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. सगळ्याच अपेक्षांची पुर्तता करणारं मशिनसुद्धा बाजारात अजून उपलब्ध नाही तिथे मुलांची काय कथा? नोकरी हवी.. ती सरकारी हवी.. त्यात चांगली पोस्ट हवी.. त्यात चांगला पगार हवा.. त्यात बॅंक बॅलन्स हवा.. त्यात गाडी हवी.. त्यात घर हवं.. तेही पुण्या मुंबईत हवं.. त्या घरात फक्त आपणच रहायचे... सासू सासरे नंनंद वैगेर आपल्याजवळ नको..जमिन हवी.. त्यात पाणी हवं.. बागायती हवी.. पन मुलगी शेतात काम करणार नाही..मग शेती कसायची नाही तर शेती हवी कशाला? मुलगा सुंदर हवा..शिकलेला हवा.. निर्व्यसनी हवा..वय जास्त नको..विचार चांगले हवे..मुलीच्या आई वडिलांचा आदर करणारा हवा.. किती ह्या अपेक्षा?? या येवढ्या अपेक्षांचे जुलाब होत नाहीत का यांना? तुमच्या पिढ्यांना ही येवढं सगळं करता आलं नाही तर नुकत्याच नोकरी वा व्यवसायात गुंतलेल्या मुलांकडून अशा अपेक्षा कशा करू शकता ?? 

काळ बदलला हे खरच आहे. जगण्याच्या संघर्षात अपेक्षांची दिवसेंदिवस भर पडत आहे .

शिक्षणाच्या अग्निपरिक्षेतून पास तर झालो. आई वडिलांच्या अपेक्षांना पुर्ण करण्याची धडपड काय कमी.. त्यातच लग्नासाठी मुलीच मिळेना.. मुलींची येवढीही कमतरता आहे असा भाग नाही पन अपेक्षांची काय कमी गर्दी आहे? आमच्याच एका मित्राला मुलगी मिळेना.. पैसे देऊन लग्न करून आणलेली मुलगी लग्नाच्या रात्री गुपचूप पळून गेली ...मुलीच्या नातेवाईकांचा ना पत्ता ना पुरसीस..फोन बंद..नॉट रिचेबल...'शुभमंगल.. विश्राम.. '

        असे अनेक लोक सर्रास या लग्न जाळ्यात अडकत आहेत. सतत वृत्तपत्रात अन बातम्यामध्ये एकाच महिलेने अनेक लग्ने केल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. उसन्या लग्नाने अनेक तरुणांची आयुष्ये उध्वस्त होत आहेत. बरं ही झालेली फजिती कोणाला सांगून आणखी फजिती करून घेण्यापेक्षा गप्प राहिलेले बरं म्हणुन ही गोष्ट उघड ही होत नाही. आज तो फसला उद्या दुसरा फसत जातो.. 

    खरं तर हल्ली मुलींच्या पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. सगळ्याच अपेक्षांची पुर्तता करणारं मशिनसुद्धा बाजारात अजून उपलब्ध नाही तिथे मुलांची काय कथा? नोकरी हवी.. ती सरकारी हवी.. त्यात चांगली पोस्ट हवी.. त्यात चांगला पगार हवा.. त्यात बॅंक बॅलन्स हवा.. त्यात गाडी हवी.. त्यात घर हवं.. तेही पुण्या मुंबईत हवं.. त्या घरात फक्त आपणच रहायचे... सासू सासरे नंनंद वैगेर आपल्याजवळ नको..जमिन हवी.. त्यात पाणी हवं.. बागायती हवी.. पन मुलगी शेतात काम करणार नाही..मग शेती कसायची नाही तर शेती हवी कशाला? मुलगा सुंदर हवा..शिकलेला हवा.. निर्व्यसनी हवा..वय जास्त नको..विचार चांगले हवे..मुलीच्या आई वडिलांचा आदर करणारा हवा.. किती ह्या अपेक्षा?? या येवढ्या अपेक्षांचे जुलाब होत नाहीत का यांना? तुमच्या पिढ्यांना ही येवढं सगळं करता आलं नाही तर नुकत्याच नोकरी वा व्यवसायात गुंतलेल्या मुलांकडून अशा अपेक्षा कशा करू शकता ?? 

      मुली मिळाव्या म्हणुन विवाह (मॅट्रीमोनियल) साईटवर फसवणुकीचे प्रकारही नवे नाहीत. मग मुलीची फसवणुक असो की मुलाची. त्या दिवशी वधू वर सुचक मेळाव्याला माझे मित्र गेले. ते म्हणाले इथे मुलाकडच्या नातेवाईकांचा भरणा जास्त ,त्यात वये होऊन गेलेल्या मुलांचा भरणा जास्त,विधूर पुरुष त्याच रांगेत.

 मुळात सामाजिक समतोल बिघडत चालला आहे. स्री अन पुरूष ही निसर्गातील मानवजातीची महत्वाची बाजू.. पन कुठेतरी मुलाच्या हव्यासाने झालेल्या स्री-भृणहत्या , अपेक्षांचे वाढलेले ओझे, लग्न झालझालं तर अपेक्षांची पुर्तता झाली नाही की घटस्पोट, घटस्पोट झाले की पुन्हा शोधाशोध, पुन्हा धावाधाव, पुन्हा तुटलेल्या मनावरच्या जखमा , पुन्हा त्याचा संसारावर परिणाम, संकुचित विचारांचं सावट वेगळच. लग्न केलं तरी रुढीचा फास वेगळाच, त्यातून जुन्या-नव्याची(सासु-सुनांची) किरकीर, भांडणे.. बाहेरच्या जगात शिकून बेरोजगारीचं सावट, जास्त शिकून कमी पगाराची नोकरी, उच्च शिक्षण लपवून कमी शिक्षण दाखवुन छोटासी नोकरी पदरात पाडायची..व्यवसाय करायला त्यातील मोठी जोखिम, मोठी गुंतवणूक,प्रचंड स्पर्धा अशी वेगळीच मारामार मुलांना सहन करावी लागते. त्यात अपेक्षा कशा पुर्ण करणार..

   मुळात भारतीय समाजात कुटूंब व्यवस्थेत प्रश्न खुप आहेत. त्यात जेवढ्या अपेक्षा तेवढा पश्चाताप जास्त होऊ शकतो. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून राहण्यापेक्षा थोडं वास्तव समजून घ्यायला हवं. शेवटी वस्तूस्थिती हे सार्वजनिक सत्य आहे ते नाकारून कसे चालेल.मोठेपणाचा दिखावा करण्यासाठी एका पिढीचं नुकसान तर करत नाहीत ना? याचाही समाजाने जबाबदारपणे याचा विचार करायला हवा. 

_____________

ॲड. बिभीषण गदादे 

सं-७७०९३१३४३५

दि. ४.५.२०२२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

राजकारण...आणि आम्ही.

तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??