पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??

इमेज
  आपल्या पोटच्या पोराने धोका द्यावा तसा सरकारने शेतकऱ्यांना दिला. शेतकरी आजवर हजारो अवकाळी पावसाळी संकटाला तोंड देऊन आता सहनशील झाला आहे. पण ४०% निर्यात शुल्क लावणेपण हा धक्का निसर्गनिर्मित नव्हता आपल्याच मायबाप मानल्या जाणाऱ्या सरकारने दिलेला हा धक्का  म्हणजे शेतकऱ्याचा विश्र्वासघातच नाही का?                    कधी नव्हे तेच जागतिक बाजारात कांदा तेजीत दिसला, शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या, आणि कसबसा जपून ठेवलेला कांदा कंटेनर मध्ये भरून बाजारात पोहोचला. प्रचंड आशा उराशी बाळगून निर्यात करण्यास तयार झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. देशांतर्गत मालाची भाववाढ रोखण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के कर लादून शेतकऱ्याच्या आनंदावर विरजण टाकण्याचं आणि त्याच्या अन्नात विष कालवण्याच पाप त्याच्याच देशातील सरकारने केलं. आपल्याच घरून झालेली घरफोडी ही त्या शेतकरी बापासाठी धक्कादायक होती.           २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये निर्यात ६३% ने वाढल्याचे अहवाल सांगतो. देशातील २४.२५ दशलक्ष टन उत्पादन अडचणीत सापडले. पैक...

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

इमेज
   प्रचंड अस्थिर २०१९-२०२३ या वर्षात सतत मतदार म्हणून आमचा अपमान होत आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पक्ष संघटना म्हणजे बापघरची जहागीर... कार्यकर्ते त्या जहागिरीत राबणारे घरगडी.. जसं सांगेल तसे वागणार.. बरं ती बापघराची जहागीर वाटेल तशी वाटेल तिकडे पळवायची गरज पडले तर बापही पळवून न्यायचा.. तसा आला नाही तर फोटोरुपात पळवयाचा... जनता काय म्हणेल वैगेरे सोडाच हो...जनता किस खेत की मुली..   तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही कार्यरत किंवा रिटायर्ड नोकरदार आहात.. की तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रातील कोणी अभिनय, नाट्य, लेखन , कविता अश्या क्षेत्रात काम करीत आहात... कोणी नसाल तर अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देत आहात... पण मनात काय म एक भीती आहे....की,    सरकार बदलेल का? अचानक उत्पादन घटेल का? उत्पादनाला किंमत मिळेल का? आपल्यासाठी आज विरोधक म्हणून उभा उद्या सरकारात जाईल का? किंवा गेला तर तो बंड करून, धोखा देऊन जाईल का? यंत्रणांना हाताशी धरून त्याची बोलती बंद केली जाईल का? किंवा आता जे घडतं आहे त्यामुळे मी चूक केलीय अस वाटत का?  ...