राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?
![]() |
प्रचंड अस्थिर २०१९-२०२३ या वर्षात सतत मतदार म्हणून आमचा अपमान होत आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पक्ष संघटना म्हणजे बापघरची जहागीर... कार्यकर्ते त्या जहागिरीत राबणारे घरगडी.. जसं सांगेल तसे वागणार.. बरं ती बापघराची जहागीर वाटेल तशी वाटेल तिकडे पळवायची गरज पडले तर बापही पळवून न्यायचा.. तसा आला नाही तर फोटोरुपात पळवयाचा... जनता काय म्हणेल वैगेरे सोडाच हो...जनता किस खेत की मुली..
तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही कार्यरत किंवा रिटायर्ड नोकरदार आहात.. की तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रातील कोणी अभिनय, नाट्य, लेखन , कविता अश्या क्षेत्रात काम करीत आहात... कोणी नसाल तर अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देत आहात... पण मनात काय म एक भीती आहे....की,
सरकार बदलेल का? अचानक उत्पादन घटेल का? उत्पादनाला किंमत मिळेल का? आपल्यासाठी आज विरोधक म्हणून उभा उद्या सरकारात जाईल का? किंवा गेला तर तो बंड करून, धोखा देऊन जाईल का? यंत्रणांना हाताशी धरून त्याची बोलती बंद केली जाईल का? किंवा आता जे घडतं आहे त्यामुळे मी चूक केलीय अस वाटत का?
जनसामान्यांना वाटणारी भीती आता उघड होत आहे. सगळीकडे घात पात , फोडाफोडी , जणू काही युद्धाचेच संकेत...अश्या भीतीदायक वातावरणात जीव आता गुदमरत आहे. सरकारे निवडून द्यावी की नको.. द्यावी तर कोणती आणि का? अश्या असंख्य प्रश्नाबाबत जनता आजही अनुत्तरित आहे. उत्तरे शोधत आहेत पण सापडत नाहीत. फक्त प्रश्न सतावतात. उघडपणे बोलावं तर कोणाशी ? अश्या प्रचंड अस्थिर २०१९-२०२३ या वर्षात सतत मतदार म्हणून आमचा अपमान होत आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पक्ष संघटना म्हणजे बापघरची जहागीर... कार्यकर्ते त्या जहागिरीत राबणारे घरगडी.. जसं सांगेल तसे वागणार.. बरं ती बापघराची जहागीर वाटेल तशी वाटेल तिकडे पळवायची गरज पडले तर बापही पळवून न्यायचा.. तसा आला नाही तर फोटोरुपात पळवयाचा... जनता काय म्हणेल वैगेरे सोडाच हो...जनता किस खेत की मुली.. इलेक्शन लागलं की थोड रडू, थोडे हतबल दाखवू, थोडे आरोप करू, थोडा धर्म आड आणि..हा धर्म हे तर रामबाण अफुच औषध...!! या आणि अश्या आविर्भावात नेतेमंडळी वावरत असताना जनतेने काय फक्त बघ्याची भूमिका घ्यायची.. नाहीतर मीडियावरच्या बातम्या पहायच्या..
तुम्हाला नाही वाटतं की हे सगळं चुकीचं होत आहे.. हो वाटतं न पण बोलून कशाला थोबाड खराब करून घ्यायचं..नाही का ? पण जर आपण सगळेच व्यक्त व्ह्यायचे थांबलो तर हे थांबणार कसे..नाही नाही आता आपण सगळे बोलायच.. कुठला पक्ष न काय? ते धर्मावर, जातीवर, बोलतील आपण विकासावर बोलू... त्यांनी पक्ष फोडले, नेते तोडले,जोडले, आपण लोकशाही जपून ठेऊ.. जनतेतून आवाज आला पाहिजे.. तुम्ही चुकीचे आणि तेही चुकीचे अस म्हणता आलं पाहिजे... शेवटी आपण जनता आहोत...राजा आहोत.. राजा गप्प कसा बसेल.. तुम्हाला सतावणारा प्रश्न घेऊन लिहा.. यापुढे प्रस्थापित राजकारणाला हद्दपार करण्यासाठी तयार होऊ..
कवी नामदेव ढसाळ यांच्या भाषेत
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी
जन्मभर राहायचे का असेच युद्धकैदी
ती पहा तेही पहा मातीची अस्मिता आभाळभर झालीत
माझ्याही आत्म्याने झिंदाबाद ची घोषणा केलीय
रक्ताने पेटलेल्या अगणित सुर्यानो..
आता शहराशहराला आग लावित चला...
ॲड.बिभीषण गदादे (जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा