कामगार दिन.. नव्या समस्यांच्या उंबरठ्यावर
प्रथमता कामगार /मजुर दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा.. कामगार हा अत्यंत महत्वाचा तरीही कायम दुय्यम राहिलेला वर्ग. कामगारांचे दोन वर्ग प्रामुख्याने स्थळ ,काळ, परिस्थिती नुसार करता येतील. शहरी कामगार अन ग्रामीण भागातील कामगार. दोघांचे प्रश्न वेगळे अाहेत येवढ्या लेखात संपुर्ण खोलात जाता येणार नाही त्यामुळे फक्त स्पर्श आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. देशाची नव्हे जगाची अर्थव्यवस्था ह्या कामगार वर्गाच्या हातात आहे . त्यांच्या घामाची किंमत हीच राष्ट्राची संपत्ती.लोकशाहीर अन्नाभाऊ साठे म्हणाले होते "पृथ्वी ही शेषाच्या(शेषनाग) मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहाताच्या फोडावर तरलेली आहे" आणि हे खरच आहे. बडा बागायतदार असो की भांडवलदार, कारखानदार वर्ग असो कामगाराशिवाय हालचाल करूच शकत नाही. ग्रामीण भागातील छोटे शेतकरी, आणि शहरी भागातील छोटे उद्योग चालक हे स्वताच मालक व कामगार या भूमिकेत काम करतात. आजवर कामगारांचे अनेक लढे झाले, अनेक चळवळी आल्य.नेते आले. त्याची हजारो नावे सांगता येतील. आजच्या घडीला नवी आश्वासने पेलावी लागत आहेत. रोजगाराचे जस...