राज'कारणातील धर्म नावाचा गढूळपणा जात नाही तोपर्यत मराठी झेंडा अटकेपार पोहोचणार नाही....

 राजकारणात झळकण्यासाठी धर्म हा खुप सोपा, प्रथम व सरळ मार्ग आहे ..हा फक्त झळकण्याचा मार्ग आहे यशस्वी होण्याचा नाही. ज्या ज्या सत्तांनी धर्माच्या नावाने राजकारण टोकाला नेलं त्या सत्ता संपुष्टात आल्या. धर्मांध औरंगजेब असो की धर्मांध पेशवाई असो. अंत तर ठरलेलाच होता. ज्या राजांनी सहिष्णू राज्ये केली ती टिकली हजारो वर्षे मनावर राज्य करत राहीलं. जुलमी मुगलं सत्तेला पुरून उरणारं राजा शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य मुस्लिम म्हनुन कोणावर अन्याय करत नव्हतं.. तसेच अकबराच्या राज्यात हिंदू म्हणुन कोणाचा द्वेश नव्हता.  

        महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा शिवरायांच्या रयतराज्याचा महाराष्ट्र आहे हे फक्त बोलुन चालणार नाही. हे राज्य टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धर्माचा गढूळपणा राजकारणातून अद्याप तरी हद्दपार झालेला नाही त्यामुळे ह्या महाराष्ट्रास त्यापासून वाचवणे गरजेचं आहे. धर्माच्या नावाने राजकारण करणं गैर नाही मात्र परधर्मियांचा द्वेश करून राजकारण गढुळच. मराठी झेंडे अटकेपार जात असताना मशिदींवरिल भोंगे , हनुमान चालीसा अशा अतार्किक मुद्यावर राजकारण करण्याची गरज नाही. पन त्यांना पडते त्यांना कदाचीत हे कळत असावं. पन कळत असूनही ते त्याच मुद्यावर ठाम राहणार आहेत. पडत्या काळात असे मुद्दे जोर धरतात. जोपर्यत जनता सुज्ञ आहे तोपर्यत अशा मुद्यांना कोणी भीक घालत नाही. दहा दिवसाच्या गणेशोत्सवात मुस्लिम बांधवाची कसलीही तक्रार नसते तसं सर्वसामान्य बहुसंख्य हिंदू बांधवांची मशिदीबाबातही काही तक्रार नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. 

     राहिला प्रश्न मिडीयाचा, मिडीयाने अशा मुद्यांना प्रकाश झोतात आणायचे कशासाठी? फक्त टिआरपीसाठी . खरच आपल्या देशातील मिडीया येवढ्या खालच्या पातळीवर जाते का? राईचा पर्वत कसा करायचा आणि डोंगर पोखरून उंदिर कसा काढायचा हे मिडीयाकडून शिकावं. सततचा भडिमार, रंजक, भडक, चिखलफेकी बातम्यांना समाज वैतागला आहे. दैनंदिन जीवनातील प्रश्नाची सोडवणुक होईल अशी बातमी कानावर पडतच नाही. बातम्या पहाव्या की न पहाव्या इतक्या खालच्या पातळीवर ही मिडीया केली आहे. मिडीयाचा भोंगा आणि भोंग्याची मिडीया झाली. राणाचे चाराणे झाले, सेलिब्रिटी कम सिली'भीती झाले, विकासाचे तिन तेरा झाले, चिखलफेकी भाषणांमुळे राजकारणाचे बारा वाजले, उरले सुरले महागाई ने मेले,बाकीचे वैयक्तिक द्वेशाची शिकार झाले. 

   राजकारणातील नैतिकता हरवली, गुंडगिरी ने लोकशाहीचा घात केला, दलालांनी नैतिकतेचा बाजार केला जनता यात बेजार झाली. महागाई, बेरोजगारी ही पाचविला पुजलेली, शिक्षण, आरोग्य महाग झालं. जगण्याच्या अवास्तव संघर्षात जनसामान्याचे होणारे हाल याचं कोणालाच काहीच सोयरं सुतक नाही. वैयक्तिक चिखलफेकीपेक्षा राजकारण्यांनी जनतेच्या हिताकडे लक्ष द्यावं. अशा अपेक्षा ही आता भाकड गायीकडून दुधाची अपेक्षा केल्यासारखच ...!!! त्यामुळे आता लोकांनीच अशा राजकारणाला व समाजकारणाला हद्दपार करावं. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

राजकारण...आणि आम्ही.

तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??