लोकांना नेत्याचा 'आदर' वाटायला हवा, भीती नाही
राजकारणात वातावरण हल्ली खुप गरम आहे अशी चर्चा वरच्या स्थरात ऐकायला मिळते.पन वास्तवात राजकारणाला हल्लीच्या वातावरणाची भीती खुप कमी आहे. *राजकारणात राजा हा मतावर निवडला जातो, भाषणातल्या टाळ्यांवर नाही.* सभांमधून होणा-या भडक भाषणांनी आजवर जनतेच्या मनात 'मता'ची जागा घेतलेली दिसत नाही. सभेला *दहा हजार अन मते १ हजार* अशी अवस्था काही पक्षातील उमेदवारांची झालेली आपण पाहीली. त्यामुळे राजकारणाला भडक भाषणाची भीती नाही.
*भीती तर प्रशासनाला व जनतेला आहे.* भडकाऊ भाषणांमुळे कायदा सुव्यस्थेला धोका निर्माण होतो. शेवटी प्रशासन कमी पडल्यावर त्याचा परिणाम लोकांवर होतो. भडकलेली माथी दंगली घडवतात. ज्या बसेसने आजवर प्रवास केला त्या बसेस फुटतात. पर्यायाने तोटा सामान्य लोकांचाच होतो. भडकलेली माथी जाती, धर्म द्वेशाने पिसाळलेली असतील तर दंगली होतात पुन्हा तेच *जनतेतील एकी व सौदार्ह नष्ट होतं. नवख्या तरूणांवर गुन्हे दाखल होतात.त्यांच शिक्षण ,करियर संपून जांतं. सामाजातील द्वेशाचा परिणाम लहान मुलांवर होतो त्यातून त्यांच्यात नागरिक बनण्याची प्रक्रिया वीटाळते.* म्हणुन जनतेला अशा भडकावू भाषणांची कायम भीती वाटते.*शिवरायांची राजमुद्रा झेंड्यावर वापरण्याआधी त्याचा अर्थ समजुन घेतला असता तर बरं झालं असतं. 'रयतेच्या कल्याणाचं राज्य' काय असतं ते समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं.*
*लोकांना नेत्याचा 'आदर' वाटायला हवा, भीती वाटायला आपल्यात आणि गावगुंडात फरक आहे* यांची जाणिव या नेत्यांना व्हायला हवी.
*भडकावू भाषणे देणार्या नेत्याबद्दल आदर न वाटता भीतीच जास्त वाटते.*
*म. गांधी म्हणतात "राज्यकर्त्याने तन-मन-धन अर्पण करून देशसेवा करायची असते."* इथे राजकर्ते बनण्याची स्वप्ने पाहणारे जनतेला तलवारी वाटू म्हणतात, हिंदू मुसलमान म्हनुन भांडणे लावतात, मंदिर -मशिदी, अजान- चालिसा अशा मु्द्यावर भांडत बसताहेत. जनतेला 'तन-मन' अर्पण करायचं सोडून तन-मन'च भडकवून दिलं जातय, जनतेला 'धन' अर्पण करायचं तर दुरच ..हे आहे त्याच जनतेच्या सार्वजनिक मालमत्तेच नुकसान कसं होईल हे पाहत आहेत. त्यामुळे *अशा नेत्यांच्या सभांवर सार्वजनिक बहिष्कार घालणे गरजेचे.* भाषणाचा संविधानिक अधिकार नाकारता येणार नाही निदान भाषणातील मुद्याना सदविवेक वापरून समजुन घ्यायला हवे. त्याच्या वाईट परिणामांबाबत जागृत रहायला हवं, व इतरांनाही जागृत करणे गरजेचे. जनतेने आता सरळ शहाणं बनावं .*आपल्या खोपडीत आपलाच मेंदू हवा, तोही जागृत, विवेकी. "जागे रहा. रात्र वै-याची आहे."*
____________
अॅड बिभीषण गदादे
सं-7709313435
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा