चळवळी, राजकारण की फक्त चिखलफेक ??

 *ह्या चळवळी की पातळी सोडलेली चिखलफेक??*


      भारतातील सांस्कृतिक चळवळींचे तीन भागात विभाजन करता येईल साधारण इ. स १९०० पूर्वीचा कालखंड आणि १९०१-२००० चा कालखंड व २००१ नंतरचा कालखंड.

        इ.स.१९०० च्या आधीच्या चळवळीला प्रवाहाविरूद्ध वाहण्याचा धर्म होता.त्याला एक वैचारिक बैठक होती, चळवळीचा कार्यकर्ता चळवळीचा विचार समजून घेतल्या शिवाय तोंड उघडत नव्हता. प्रचंड विरोधाला उत्तर देता यावं हा उद्देश त्यामागे होताच. या चळवळीत सहसा कार्यकर्ता मिळत नसायचा आणि एकदा का कार्यकर्त्याने चळवळीचा विचार मनावर घेतला की तो शेवट पर्यत तो विचार सोडत नव्हता. त्यावेळची प्रसारमाध्यमे म्हणजे वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिके ही मोजकीच होती पन त्यात *स्वतंत्र विचार जन्माला घालण्याची व माकडाचा माणूस बनवण्याची ताकद होती.*

            इ.स१९००नंतरच्या काळात कार्यकर्ते तयार होणं हा शिक्षीत होण्याचा भाग होता. त्यामुळे तसा तुटवडा नव्हता, चळवळीचा उद्येश स्वतःच्या सोयीने घेणे सुरू झाले, पर्यायाने ढीगभर वृत्तपत्रांनी जन्म घेतला. *वृत्तपत्रात विचार होते पन चिखलफेकीवर जास्त भर होता.* मुळात त्यावेळी चिखलफेक करताना कार्यकर्ता निदान स्वताची पातळी सोडत नव्हता.

       इ.स २००० नंतरच्या कार्यकर्ता म्हणजे ना डोकं ना विचार, चार दिवस चळवळीत आला तरी बोलण्याची पातळी सोडायची, स्टेज भेटले की विचारहीन बडबड करायची, जातीय द्वेशाची पेरणी करायची, नाव महापुरुषांचं घ्यायचे पन विचार द्वेशाचद्वेशाचा पेरायचा, नुसतीच बडबड कर्तृत्वाचा थांगपत्ता नाही, कृती करणे तर दुरच व्यर्थ वाचाळता जास्त. 

आता साधारणता पाठीमागच्या दशकात इंटरनेट आलं आज शेंबड्या पोराकडे मोबाईल आला, पटकन चळवळीत प्रवेश मिळत असल्याने चळवळीचा विचार सोडून याने त्याच्यावर, त्याने त्याच्यावर चिखलफेक करायची म्हणजे आपण पूर्णवेळ कार्यकर्ता झालो . *राजकारणातील व्यक्तीवर चिखलफेक करायला तशी जास्त अक्कल लागत नाही. आताचे राजकारणी ही त्या उंचीचे नाहीत तो भाग वेगळा.* पन कार्यकर्ता हा चळवळीचा प्राण असतो. *चळवळीचा मुळ विचार समजून त्या चळवळीला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी बाळगण गरजेचं.*

         हल्ली व्हाट्सएप फेसबुक वर *जातीचे कळप (गृप) पहायला मिळतात. भाडेकरू नोकरांप्रमाणे फक्त इकडचा मेसेज तिकडे पाठवला की बापाची कमावली असा समज.*

मिळालेली माहीती खरी की खोटी? त्याचा सत्याशी किती संबध? त्याचे समाजावर काय परिणाम होतील? समाज म्हनुन त्याची किती किंमत आहे? इतरांप्रमाणे आपणही चिखलफेक करत आहेत का? इतरांवर टिका करताना आपण आपली पातळी सोडत आहोत का? आपली तेवढी उंची आहे का? अभ्यास आहे का? त्यामुळे चळवळी साठी आयुष्य वेचलेल्या महामानवांचा अपमान तर होणार नाही ना? अशा एकाही प्रश्नाचे विचार न करता ह्या चळवळी सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

      *सामाजिक चळवळीची नैतिकता जपणे कुठेतरी गरजेचं आहे.* कार्यकर्त्यांनी चळवळीचा विचार सांगत असताना स्वताचे अपरिपक्व विचाराची त्यात सरमिसळ करू नये. वैयक्तीक चिखलफेक टाकावी, नैतिक मुल्यांची बैठक चळवळीचा प्राण आहे, मानवता हा आत्मा आहे. तो पातळी सोडून बोलतो म्हनुन आपणही पातळी सोडू नये. मुर्खांशी वाद घालणे टाळावे. चळवळीत प्रवेश करण्यापूर्वी त्या चळवळीचा पुर्ण अभ्यास करावा, आपले हित अहीत,मित्र शत्रू समजून घ्यावेत, कायम उद्याच्या भविष्याचा विचार करूनच कृती करावी. 

*सामाजिक मुल्ये मारून चिखलफेक करून चळवळ जिवंत ठेवणे म्हणजे चळवळीचा खुन करणे होय. चळवळीची विचारांची युद्धे विचारांनी खेळावी त्यासाठी आपली वैचारिक साधणे जसे वाचन,मनन, चर्चा, भाषण यांची बैठक पक्की करावी ही आजच्या काळातील गरज आहे.*

_____________________

लेखक-अॅड बिभीषण गदादे 

कवी, वक्ता, निवेदक

सं-७७०९३१३४३५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

राजकारण...आणि आम्ही.

तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??