राजकिय इच्छाशक्तीचा अभाव भरून काढण्याचे माळी समाजापुढे आव्हान

राजकिय इच्छाशक्तीची उणीव भरून काढल्याशिवाय समाजाला अस्तित्वाची जाणिव होणार नाही. समाज व्यवस्थेत हजारो वर्षे वंचित राहिलेल्या घटकाला डॉ. बाबासाहेबांनी संदेश दिला *''जा अन तुमच्या घराच्या भींतीवर लिहून ठेवा ..तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे" ..* समाजिक प्रश्नांची सोडवणुन करण्यासाठी कमी अधिक प्रमाणात का होईन राजकिय इच्छाशक्तीची गरज पडते हे खरच आहे. कालपरवाचेच उदाहरण पाहिलं की जो विचार अमोल *मिटकरींसह हजारो पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते वर्षानुवर्षे सांगत होते तोच विचार एका राजकिय पक्षाच्या मंचावरून सांगीतल्याने त्याची सुसाट चर्चा झाली.* *राजकारणात प्राबल्य नसणे हे सामाजिक दुबळेपणाचं लक्षण आहे.* हा दुबळेपणा भरून काढण्यासाठी शिक्षणातून राजकारणाचे धडे मिळणे हे आज गरजेचं आहे. तालमीत मल्लविद्या शिकता शिकता राजकारणाची सुपारी कानात फोडावी. तशी राजकारणाची विद्या शाळा महाविद्यालयातून मिळणं गरजेचं आहे. शिक्षणात शिकवल्या गेलेल्या गोष्टीपेक्षा शिक्षण मिळवून सामाजिक प्रश्न ओळखण्याची ताकद अंगी यायला हवी. *म. फुलेंनी शिक्षण घेतल्याशिवाय बदल होणार नाही असं सांगितलं तर डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणांनंतर समाजाला संघर्ष केल्याशिवाय न्याय नाही हे सांगीतलं.अहिल्यादेवींनी बळ बुद्धी चातुर्य असल्याशिवाय लोकाभिमुख राज्यकर्ता होता येत नाही हे सांगितलं.* आज माळी समाज हा शिक्षित आहे, मात्र संघटीत नाही. संघर्ष करण्यायेवढा परिपक्व आहे पन करायला त्याच्याकडे अजेंडा नाही. *अजुनही माळी हा म.फुले की सावता महाराज या प्रश्नातच गुंतलेला आहे..फुले समजावेत येवढी वैचारिक ताकद, आणि सावता महाराज समजावेत येवढी आध्यात्मिक ताकद माळी समाजात आलेली नाही* माझ्या या वाक्याने कदाचीत भावना दुखावतील   सुद्धा पन हे सत्य आहे. म फुले स्विकारताना पुरोहीतशाहीच्या आहारी गेलेलो असताना शक्य आहे का.. पुरोहीतब्राह्मणाचे पाय पुजायचे सोडले आहेत का? तर नाही. अद्याप तरी तेवढ्या प्रमाणात नाही. *सावता महाराज समजायला मुर्तीपुजेशिवाय आमचा दिनक्रम चालतो का?* कर्मसिद्धांत समजला असता तर सावता महाराजांची मंदिर व्हावी हा विचार तरी जन्म घेतला असता का? *मुर्तीपुजेशिवाय ईश्वर भक्ती करता येते हे समजण्यायेवढे फुले व सावतामहाराज आम्हाला समजले का? तर नाही.* फुले व सावता महाराज यांचे विचारच मुळात एक आहेत फक्त सांगण्याचे मार्ग वेगळे आहेत. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा दोन गटात विभागलेला माळी समाज एक होईल. कालपर्यत सावता परिषदेच्या मंचावर संघप्रणित भाजपाची मांदीआळी होती.. आता येणार्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षीय नेत्यांची मांदीआळी पहायला मिळेल. याचा अर्थच हा आहे की *आमचे राजकिय हीत कुठे आहे याचाच अजुन थांगपत्ता नाही.* समता परिषद किंवा सावता परिषद या दोन्ही संघटनांकडे माळी समाजाच्या एका प्रश्नावर एकमत आहे का? *जर एकमत नसेल तर समाज एक कसा होणार?* माय सावित्रीआई ने सुरू केलेली शाळा पडायला आली, अरणचा धार्मिक विकास हा समाज एकीसाठी गरजेचे आहे. अरणचा विकास हा माळी समाजाच्या तरूणांचा विकासाचा भाग आहे की नाही मला माहित नाही. मी त्यातील तज्ञ नाही. *फुलेवाडा , भीडेवाडा ही ठिकाणे आपली अस्मिता आहेत. ती सर्व समाजासाठीची मंदिरेच आहेत* ती टिकवण्यासाठी माळी समाजाने आपली शक्ती वापरावी. *माळी समाजाचा विकास हा आध्यात्मिक, व वैचारिक प्रबोधन व राजकिय इच्छाशक्ती या तिन्ही च्या आधारे शक्य आहे.* पन त्यासाठी *सावता महाराज हे मूर्तीतून नाही तर कृतीतून समजून घ्यावे. व फुले हे जातीतून नाही तर विचारांतून समजून घेणं गरजेचं.*

__________________

अॅड बिभीषण गदादे 

सं 7709313435

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

राजकारण...आणि आम्ही.

तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??