३० मे चा अरणचा माळी समाज मेळावा, मुद्दे आणि पाठलाग

   सरकारे येतात आणि जातात, मुळ समाजकारण जिवंत राहीलं पाहिजे. आज याची सत्ता तर उद्या त्याची असेल मात्र सामाजिक भुमिकांशी पाठ फिरवुन चालत नाही. कल्याण काका आखाडे यांनी आज दि ३० एप्रिल २०२२ रोजी अरणाला ऐतिहासीक मेळावा घेतला. त्यासाठी कल्याणकाका आखाडे यांचं मनापासून अभिनंदन व आभार. 

    माळी समाजाचा मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आता स्वत: सरकारच या मेळाव्याला आलं म्हणले तर गैर नाही.सावता महाराजांची जीवंत समाधी अरणला अ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जाच्या प्रश्नावर तुर्तास अजित दादांनी हिरवा कंदील दिला. ४-५ तारखेला तशी बैठक होणार आहे. अरण ते पंढरपुर पालखी मार्गाचा ही विचार सरकार म्हनुण केला जाईल असेही दादा म्हणाले.आवाक्यात असणारी कामांसाठी होकार मिळाला येवढं आजच्या मेळाव्याचे यश म्हणावं. 

"सावता महाराजांचे विचार महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कल्याणासाठी महत्वाचे आहेत" हा विचार मात्र अजित दादा यांनी बोलून दाखवला. माळी समाजाचे अर्थिक, सामाजिक, राजकिय प्रश्न यासाराख्या प्रश्नांना सरकारने रितसर बगल दिली. 

     ओबीसी आरक्षण, माळी समाजाचे सामाजिक प्रश्न, राजकिय अस्तित्व याबाबात विधाने करणे अजित दादांनी टाळले . या मुद्याचा पाठलाग केला की लक्षात येईल उद्याच्या काळात माळी समाजाचा रोष नको म्हनुन वरवरची आश्वासने देणं टाळलं.याला मुळात धनगर समाजाचा इतिहास अाहे. कारण धनगर समाजात आश्वासने देने राष्ट्रवादी सरकारला परवडलं नाही .त्याच आश्वासनांची पुर्ति झाली नाही म्हनुन मोठा धनगर वर्ग आधी वंचित नंतर भाजपाच्या गोटात गेला हे आपण पाहिलं. मुळात समाजाचा रोष टाळायचा असेल तर पोकळ आश्वासने देणं अजितदादांनी टाळलं. यात अजितदादांचं समाजकारण व सरकार म्हणुन असलेली जबाबदारी लक्षात आली. पन... पन मेळाव्याचे फलित काय? माळी समाजाच्या विकासासाठी काही मिळालं का? माळी समाजातील तरुणांची शैक्षणिक, राजकिय वाटचाल ,त्यातील अडचणी सरकार माय बाप ने समजून घेतल्या का? मी पाठीमागेच माझ्या लेखात लिहिलं आहे की, कोणत्याच पक्षाकडे माळी समाजासाठी कोणताही बी-प्लॅन नाही. आज पुन्हा माळी समाजाने आत्मचिंतन करावं, खरचं आम्ही आमचा राजकिय वालीवारस संघप्रणित भाजपा किंवा प्रस्थापीत आघाडी सराकार या मध्ये शोधत आहोत का? आमची राजकिय दिशा काय? आमच्या सामाजिक प्रश्नाचं घोंघडं कुठं आहे? 

   असो पन आजतरी येवढं म्हणता येईल की प्रचंड उन्हाच्या तडाख्यात मेळाव्यात फुल ना फुलांची पाकळी पदरात पडेल अशी आशा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री निदान दिलेले शब्द पाळतील, भाजपा सारखी पोकळ आश्वासने तरी दिली नाही. दिली आश्वासाने त्याचा पाठलाग होईल येवढीच आशा. 

________

अॅड बिभीषण गदादे

सं-7709313435


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

राजकारण...आणि आम्ही.

तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??