पोस्ट्स

माळी समाजातील तरूणांची दशा व दिशा

इमेज
 माळी समाजातील तरूणांची दशा व दिशा ॲड. बिभीषण गदादे पाठीमागच्या पिढीच्या खांद्यावर उभी राहून पुढची पीढी जन्म घेत असते. गेल्या पीढीतील माळी समाजाच्या अर्थिक सामाजिक राजकिय उंचीवर आताच्या फळीतील व पिढीतील माळी तरूणांची उंची लक्षात येईल. त्या अर्थाने या पिढीवर पाठीमागच्या पिढीचा मोठा प्रभाव आहे हे नाकारून चालणार नाही. रोटी ,कपडा, मकान या संघर्षातच आमची अगोदरची पिढी खर्च झाली हे वास्तव आहे. आता त्या अर्थाने  सद्यस्थितीतील धडपड्या तरूणांना चांगले दिवस आहेत. रोटी, कपडा, मकान च्या पलिकडे व्यावसायिक व शैक्षणिक उंचीवर जाण्याचा मानस आताच्या तरूणांकडे दिसतो. कारण रोटी कपडा पुरता संघर्ष राहिला नाही.व्यवसाय व शिक्षणातही अग्रेसर राहिलेला तरूण आज पहायला मिळतो. पाठीमागच्या पिढीचे हेच उपकार आहेत. आता ज्यांच्या पाठीमागच्या पिढीने  हातपाय हलवले नाहीत त्यांना अर्ध आयुष्य तरी प्राथमिक गरजांच्या साठी खर्च करावं लागत आहे हे वास्तव. शिक्षण, मती, निती या पायर्या चढलेला तरूण या प्रचंड चढाओढीच्या युगात उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरिही वित्त, व सत्ता याबाबतीत या पिढीला मोठा संघर्ष करावा लागणार...

राजकारण...आणि आम्ही.

इमेज
   राजकारण...आणि आम्ही.                          _ॲड. बिभीषण गदादे        राजकारण..आम्हाला काय इंटरेस्ट नाही. असं म्हणलं म्हणजे आपण फार काही शहाणं झालो असं समजायचं मुळीच कारण नाही. माणुस हा समुहाने राहणारा प्राणी आहे. समुह म्हणलं की समुहाच्या अस्तित्वासाठी नियम आले. नियम मग ते बनवणारी शाखा अाली, ती राबवणारी यंत्रणा आली , यंत्रणेसाठी खर्च आला..अर्थकारण आलं आणि मग पुन्हा त्याचेही नियम आले. या नियमाला बनवणारी सरकार नावाची यंत्रणा आली. जी जन्म घेते राजकारणातून.. म्हणुन कितीही शहाणपण वापरून राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तरी तोटा जनतेचाच होणार आहे. हे समजून घ्यायला हवं.    पटो किंवा न पटो समाजात अस्तित्वासाठी प्रत्येकाचा अंतर्गत लढा चालू असतो. तसाच भारतीय समुहातही हा लढा हजारो वर्षापासून लढला जातोय. या लढ्याला वेगवेगळ्या पातळीवर लढता येतं. जसं, घरातले नियम आणि अंमलबजावणी साठी घरात कोण राजा असावा यासाठी मातृसत्ताक व पितृसत्ताक व्यवस्थांमध्ये राजकारण आहे. गावचा कारभार कोणी पहायचा यावरून सरपंच पद...

शुभमंगलं... विश्राम..!!!

इमेज
    शुभमंगलं.. विश्राम!!    -------अॅड बिभीषण गदादे खरं तर हल्ली मुलींच्या पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. सगळ्याच अपेक्षांची पुर्तता करणारं मशिनसुद्धा बाजारात अजून उपलब्ध नाही तिथे मुलांची काय कथा? नोकरी हवी.. ती सरकारी हवी.. त्यात चांगली पोस्ट हवी.. त्यात चांगला पगार हवा.. त्यात बॅंक बॅलन्स हवा.. त्यात गाडी हवी.. त्यात घर हवं.. तेही पुण्या मुंबईत हवं.. त्या घरात फक्त आपणच रहायचे... सासू सासरे नंनंद वैगेर आपल्याजवळ नको..जमिन हवी.. त्यात पाणी हवं.. बागायती हवी.. पन मुलगी शेतात काम करणार नाही..मग शेती कसायची नाही तर शेती हवी कशाला? मुलगा सुंदर हवा..शिकलेला हवा.. निर्व्यसनी हवा..वय जास्त नको..विचार चांगले हवे..मुलीच्या आई वडिलांचा आदर करणारा हवा.. किती ह्या अपेक्षा?? या येवढ्या अपेक्षांचे जुलाब होत नाहीत का यांना? तुमच्या पिढ्यांना ही येवढं सगळं करता आलं नाही तर नुकत्याच नोकरी वा व्यवसायात गुंतलेल्या मुलांकडून अशा अपेक्षा कशा करू शकता ??   काळ बदलला हे खरच आहे. जगण्याच्या संघर्षात अपेक्षांची दिवसेंदिवस भर पडत आहे . शिक्षणाच्या अग्निपरिक्षेतून पास तर झालो. ...

सावधान..!! रात्र अन दिवसही वै-याचा आहे.. -एडवोकेट बिभीषण गदादे

इमेज
             सावधान..रात्र अन दिवसही वै-याचा आहे   आपल्याकडे एक म्हण आहे 'झालं-गेलं-गंगेला मिळालं' दारुडा जरी मेला तरी मेल्यावर 'कसा का होईना बरा होता बिचारा..' म्हणायचा रिवाज आहे. माणसाच्या मृत्युनंतर त्याच्याशी असणारं वैर संपायला हवं. काल परवा औरंगाबाद ला एक सभा झाली. सभेच्या वक्त्याने अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाचं डफड वाजवायला सुरू केलं. खिलजी हा मुसलमान होता की हिंदू होता माहीत नाही पन द्वेशाचं सरण मात्र आज ही धार्मिक राज'कारणाच्या मनात धुसमसत आहे हे स्पष्ट झालं. आणि मग हिंदू मिर्झाराजे जयसिंगाच्या आक्रमणावर कोणी का बोलू नये? हा प्रश्न वेगळा.      शरद पवारांनी जातीच्या आधारे द्वेश पसरवल्याचा आरोपही या सभेत झाला. जाती वरून द्वेश करणं चुकीचं असल्याचं ज्ञान वक्त्याने पाजळलं. बरोबर आहे 'जातीच्या आधारे द्वेश करणं चुकीचं आहेच.. माणसा-माणसात कशाला भेद करायचे, नाही का? ' पन माननिय वक्त्याने धर्म धर्मात भेद करण्यावर ब्र सुद्धा काढला नाही? नाही म्हणजे जातीच्या आधारे मतं मागणारे ,राजकारण करणारे शरद पवार दोषी तर मग धर्माच्या आधारे राजकारण...

कामगार दिन.. नव्या समस्यांच्या उंबरठ्यावर

        प्रथमता कामगार /मजुर दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा..  कामगार हा अत्यंत महत्वाचा तरीही कायम दुय्यम राहिलेला वर्ग. कामगारांचे दोन वर्ग प्रामुख्याने स्थळ ,काळ, परिस्थिती नुसार करता येतील. शहरी कामगार अन ग्रामीण भागातील कामगार. दोघांचे प्रश्न वेगळे अाहेत येवढ्या लेखात संपुर्ण खोलात जाता येणार नाही त्यामुळे फक्त स्पर्श आढावा घेण्याचा प्रयत्न राहील.     देशाची नव्हे जगाची अर्थव्यवस्था ह्या कामगार वर्गाच्या हातात आहे . त्यांच्या घामाची किंमत हीच राष्ट्राची संपत्ती.लोकशाहीर अन्नाभाऊ साठे म्हणाले होते "पृथ्वी ही शेषाच्या(शेषनाग) मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहाताच्या फोडावर तरलेली आहे" आणि हे खरच आहे. बडा बागायतदार असो की भांडवलदार, कारखानदार वर्ग असो कामगाराशिवाय हालचाल करूच शकत नाही. ग्रामीण भागातील छोटे शेतकरी, आणि शहरी भागातील छोटे उद्योग चालक हे स्वताच मालक व कामगार या भूमिकेत काम करतात. आजवर कामगारांचे अनेक लढे झाले, अनेक चळवळी आल्य.नेते आले. त्याची हजारो नावे सांगता येतील. आजच्या घडीला नवी आश्वासने पेलावी लागत आहेत.     रोजगाराचे जस...

३० मे चा अरणचा माळी समाज मेळावा, मुद्दे आणि पाठलाग

   सरकारे येतात आणि जातात, मुळ समाजकारण जिवंत राहीलं पाहिजे. आज याची सत्ता तर उद्या त्याची असेल मात्र सामाजिक भुमिकांशी पाठ फिरवुन चालत नाही. कल्याण काका आखाडे यांनी आज दि ३० एप्रिल २०२२ रोजी अरणाला ऐतिहासीक मेळावा घेतला. त्यासाठी कल्याणकाका आखाडे यांचं मनापासून अभिनंदन व आभार.      माळी समाजाचा मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आता स्वत: सरकारच या मेळाव्याला आलं म्हणले तर गैर नाही.सावता महाराजांची जीवंत समाधी अरणला अ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जाच्या प्रश्नावर तुर्तास अजित दादांनी हिरवा कंदील दिला. ४-५ तारखेला तशी बैठक होणार आहे. अरण ते पंढरपुर पालखी मार्गाचा ही विचार सरकार म्हनुण केला जाईल असेही दादा म्हणाले.आवाक्यात असणारी कामांसाठी होकार मिळाला येवढं आजच्या मेळाव्याचे यश म्हणावं.  "सावता महाराजांचे विचार महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कल्याणासाठी महत्वाचे आहेत" हा विचार मात्र अजित दादा यांनी बोलून दाखवला. माळी समाजाचे अर्थिक, सामाजिक, राजकिय प्रश्न यासाराख्या प्रश्नांना सरकारने रितसर बगल दिली.       ओबीसी ...

लोकांना नेत्याचा 'आदर' वाटायला हवा, भीती नाही

 राजकारणात वातावरण हल्ली खुप गरम आहे अशी चर्चा वरच्या स्थरात ऐकायला मिळते.पन वास्तवात राजकारणाला हल्लीच्या वातावरणाची भीती खुप कमी आहे. *राजकारणात राजा हा मतावर निवडला जातो, भाषणातल्या टाळ्यांवर नाही.* सभांमधून होणा-या भडक भाषणांनी आजवर जनतेच्या मनात 'मता'ची जागा घेतलेली दिसत नाही. सभेला *दहा हजार अन मते १ हजार* अशी अवस्था काही पक्षातील उमेदवारांची झालेली आपण पाहीली. त्यामुळे राजकारणाला भडक भाषणाची भीती नाही.        *भीती तर प्रशासनाला व जनतेला आहे.* भडकाऊ भाषणांमुळे कायदा सुव्यस्थेला धोका निर्माण होतो. शेवटी प्रशासन कमी पडल्यावर त्याचा परिणाम लोकांवर होतो. भडकलेली माथी दंगली घडवतात. ज्या बसेसने आजवर प्रवास केला त्या बसेस फुटतात. पर्यायाने तोटा सामान्य लोकांचाच होतो. भडकलेली माथी जाती, धर्म द्वेशाने पिसाळलेली असतील तर दंगली होतात पुन्हा तेच *जनतेतील एकी व सौदार्ह नष्ट होतं. नवख्या तरूणांवर गुन्हे दाखल होतात.त्यांच शिक्षण ,करियर संपून जांतं. सामाजातील द्वेशाचा परिणाम लहान मुलांवर होतो त्यातून त्यांच्यात नागरिक बनण्याची प्रक्रिया वीटाळते.* म्हणुन जनतेला अशा ...